---Advertisement---
गुन्हे पारोळा

पारोळ्यात तंबाखू, सुपारीने भरलेला कंटेनर पकडला ; ६० लाखांचा मुद्देमाल जप्त..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२५ । पारोळ्यातील राष्ट्रीय महामार्ग सहावर म्हसवे शिवारात गुजरात कडून अमरावती कडे जाणारा प्रतिबंधक सुगंधित तंबाखुचा कंटेनर पोलिसांनी पकडला आहे. त्यात ४० ते ४५ लाख रुपयांचा तंबाखू व सुगंधित सुपारी आढळून आली. पोलिसांनी सुंगधीत तंबाखू व कंटेनर असा अंदाजे ६० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून रात्री उशिरापर्यंत या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू होती.

tambakhu

नाशिक आयजी पथक व पारोळा पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. विदर्भात खर्रा (बार) मध्ये लागणारी सुगंधित तंबाखू व सुपारी घेऊन एक कंटेनर (क्र. जी.जे. २३ वाय ९३७३) गुजरातकडून अमरावतीकडे जात असल्याची गुप्त माहिती आयजींच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने पारोळा पोलिसांना सोबत घेत राष्ट्रीय महामार्गावरील ढाब्यावर सापळा लावला

---Advertisement---

यावेळी पोलिसांनी कंटेनरला अडवून कंटेनरची झाडाझती घेतली असता कंटेनर मध्ये प्लास्टिकच्या ताडपत्री, मागील बाजूस ५० ते ६० मोठ्या झोल्यात सुगंधी तंबाखू गुटखाजन्य पदार्थ ठेवलेल्या अवस्थेत असलेले आढळून आले या सुगंधी युक्त तंबाखू गुटख्या ची किंमत साधारण ४० ते ४५ लाखाच्या जवळपास असून याबाबत कंटेनर ट्रकवरील चालक भरत वीरसिंग वाळवंट (वय ३५ दावत जिल्हा गोधरा, गुजरात) याला ताब्यात घेण्यात आले. सुगंधी तंबाखू व गुटखाजन्य पदार्थ हा गुजरात मधून महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात उतरणार होता. याप्रकरणी रात्री पंचनामा करण्याचे काम सुरू होते सदर घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment