⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

नियमित लिंबूपाणी पित असाल तर तुम्हाला होणार नाहीत हे आजार

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२२ । लिंबू सरबत किंव्वा लिंबूपाणी पिण्याचे फायदे सर्वांना माहीत असतातच. मात्र पण लिंबू हा अनेक शारीरिक आजारांवर उपाय म्हणजेच लिंबू पाणी आहे. हे कित्येकांना माहित नाही. अश्यावेळी लिंबू पाणी पिण्याच्या वेळा आणि पद्धतींबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. ज्यामुळे नागरिकांना विविध आजार होणार नाहीत.

पाण्यात लिंबू पिळून पिताना पाहिलं असेल. खरंतर याचं एक वैज्ञानिक कारणदेखील आहे. यामुळे व्यक्तीची पचनक्रिया सुधारते. खाणं लवकर पचतं आणि व्यक्ती फिट राहतो. म्हणजेच तंदरुस्त राहतो. यामुळे लिंबूपाणी प्यायलाच हवे. लिंबूमध्ये विटामिन सी असते. यामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. रोज सरबत पिणाऱ्यांना लिंबू सर्दी-पडसं असे आजार शक्यतो होत नाहीत.

लिंबू पाण्यात सॅट्रिक अम्ल (acid) असतं जे किडनी स्टोन होण्यापासून रोखते. जर तुम्ही दररोज लिंबू पाणी पित असाल तर तुम्हाला या आजारापासून मुक्तता मिळेल.
जर तुमच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल तर एक ग्लास लिंबू पाणी प्या. तोंडाल दुर्गंध येणं कमी होईल आणि तोंड कोरडं राहणार नाही. लिंबू आपल मेटाबॉलिज्म योग्य राखत. याशिवाय यामध्ये फायबरदेखील आहे. वजन कमी करण्यासदेखील यामुळे मदत होते.