⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

…तर क्षयरोग बरा होतो, आरोग्य विभागाकडून रुग्णांना सल्ला ‎

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२२ । यावल‎ येथील ग्रामीण रुग्णालयात शनिवारी‎ क्षयरोग संदर्भातील लक्षणे असलेल्या‎ रुग्णांचे प्रबोधन करण्यात आले. क्षयरोग‎ पूर्णपणे बरा होतो, वेळीच तपासणी,‎ उपचार करा असा सल्ला देताना आरोग्य‎ विभागाकडून रुग्णांना दिली जाणारी‎ मोफत औषधी आणि मानधनाबाबत‎ माहिती देण्यात आली.

रुग्णांनी क्षयरोग‎ संदर्भातील राज्य शासनाचे ॲप‎ मोबाइलमध्ये डाउनलोड केल्यास उपयोगी‎ ठरेल, अशी माहिती देण्यात आली.‎ शनिवारी यावल येथील ग्रामीण‎ रुग्णालयात क्षयरोग लक्षणे असलेल्यांची‎ तपासणी व त्यांना मार्गदर्शन करण्यात‎ आले. रुग्णालयात विशेष कक्षात रुग्ण‎ तपासणी झाली. या कक्षात तालुका‎ आरोग्य अधिकारी डॉ.हेमंत बऱ्हाटे,‎ वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला‎ यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुका‎ क्षयरोग समन्वयक नरेंद्र तायडे यांनी‎ रुग्णांना क्षयरोग संदर्भातील उपचार‎ पद्धती, शासनाकडून मिळणारे मानधन,‎ क्षयरोगाची प्राथमिक लक्षणे, तपासणीनंतर‎ रुग्णांची गोपनीय ठेवली जाणारी माहिती‎ या संदर्भातील मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे‎ रुग्णांना आरोग्य विभागाकडून कशा प्रकारे‎ मोफत औषधोपचार, सकस आहार व‎ आरोग्याची काळजी घेतली जाते, हे‎ देखील सांगितले. रुग्णालयात दिवसभरात‎ टप्प्याटप्प्याने रुग्णांना मार्गदर्शन करण्यात‎ आले. क्षयरोग बरा होतो, आपण मनातील‎ भीती काढून टाकावी. उपचारासाठी‎ आरोग्य विभागात संपर्क साधावा असे,‎ आवाहन देखील केले.‎