⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | आयसीआयसीआय बँकेने केले 17000 क्रेडिट कार्ड ब्लॉक ; ‘हे’ आहेत कारण?

आयसीआयसीआय बँकेने केले 17000 क्रेडिट कार्ड ब्लॉक ; ‘हे’ आहेत कारण?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२४ । जर तुम्हीही आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक असाल आणि या बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजेच आयसीआयसीआय बँकेने जवळपास १७,००० क्रेडिट कार्ड ब्लॉक केले आहे.

काही तांत्रिक बिघाडामुळे आयसीआयसीआयने ही कार्ड ब्लॉक केली आहे. ही क्रेडिट कार्ड चुकीच्या पद्धतीने अॅपला लिंक केली होती. त्यामुळे ही क्रेडिट कार्ड ब्लॉक झाली आहे. बँकेने आता पुन्हा एका कार्ड देण्यास सुरुवात केली आहे. बँकेच्या काही ग्राहकांना त्यांच्या मोबाईल अॅपमध्ये क्रेडिट कार्डची माहिती दिसत नव्हती. त्यानंतर या ग्राहकांनी बँकेशी संपर्क साधला. त्यानंतर काही तांत्रित कारणांनी कार्ड ब्लॉक झाल्याचे बँकेच्या लक्षात आले आहे. या सगळ्यात क्रेडिट कार्डचा एकही गैरवापर झाला नसल्याचे बँकेने सांगितले आहे.

आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) डेटा एक्सपोजरमुळे १७ हजार नवीन ग्राहकांची क्रेडिट कार्ड ब्लॉक केली आहेत. आता ग्राहकांना नवीन कार्ड देण्यात आले आहे. या संपूर्ण पक्रियेत एकही गैरव्यव्हार कार्डच्या माध्यमातून करण्यात आला नाही. iMobile अॅपने आंतरराष्ट्रीय व्यव्हरांना परवानगी देत ग्राहकांचा डेटा उघड केला . म्हणूनच आयसीआयसी बँकेने हा निर्णय घेतला. बँकेने १७ हजार ग्राहकांचे क्रेडिट कार्ड ब्लॉक केले होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.