⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

हूशश… पेट्रोल ९.५ तर डिझेल ७ रुपयांनी झाले स्वस्त

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२२ । केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरची एक्साईज ड्यूटी कमी केल्याने देशभरात पेट्रोल-डिझेल तब्बल ९.५ व ७ रुपयांनी स्वस्त होणार आहे. पेट्रोलवरचीचा 8 रुपये तर डिझेलवरची 6 रुपयांनी एक्साईज ड्यूटी कमी करण्यात अली आहे. हि आनंदाची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. त्यांनी केलेल्या घोषणेने पेट्रोलच्या दरात 9.5 रुपयांची तर डिझेलच्या दरात 7 रुपयांची घट होईल असे त्यांनी ट्विटर वरून सांगितले.

जगात निर्माण झालेल्या युद्धस्थितीमुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. जागतिक संकटाच्या काळात आपल्यासमोरील आव्हान वाढलं आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य यांच्यातील ताळमेळ वाढवण्याची आवश्यकता आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीचा बोजा कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं उत्पादन शुल्क नोव्हेंबर महिन्यात कमी केलं होतं. राज्य सरकारांनीही कर कमी करावेत, असं आवाहन करण्यात आलं होतं. त्याला प्रतिसाद देत काही राज्यांनी कर कमी केले. मात्र काही राज्यांनी कर कमी केले नाहीत.

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगाना, आंध्र प्रदेश, केरळ, झारखंड, तामिळनाडू या राज्यांनी केंद्र सरकारचं ऐकलं नाही. त्यामुळं त्या राज्यातील नागरिकांना महाग पेट्रोल आणि डिझेल खरेदी करावं लागलं. नोव्हेंबरमध्ये जे करायचं होतं ते काम आता व्हॅट कमी करुन नागरिकांना दिलासा द्या, असं मोदी त्यावेळी म्हणाले होते