भयंकर ! पतीने विभक्त राहणाऱ्या पत्नीला पेट्रोल टाकून जाळलं, पत्नीचा मृत्यू, पतीही ५५% भाजला

एप्रिल 5, 2023 8:36 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२३ । धरणगाव तालुक्यातील हिंगोणे बुद्रूक येथे एक धक्कादायक घटना समोर आलीय. पतीने विभक्त राहणाऱ्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना घडलीय. यामध्ये पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तर पतीही ५५% भाजला असून त्याचीही प्रकृती गंभीर आहे. याबाबत धरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

fire jpg webp

नेमकी काय आहे घटना?
रिंगणगाव (ता.एरंडोल) येथील रहिवासी संतोष भिल (६३) व त्यांची पत्नी मीराबाई भिल (५५) यांच्यात काही वर्षांपासून वाद सुरू होता. त्यामुळे दोघेजण वेगवेगळे राहत होते. मीराबाई हिंगोणे बुद्रुक येथे माहेरी आल्या होत्या. रविवारी रात्री अडीचला संतोष भिल हिंगोणेत आला.

दोघांत शाब्दिक चकमक उडाली. यानंतर संतोषने मीराबाईच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. या वेळी स्वत:वरही पेट्रोल उडाल्याने संतोषच्या कपड्यांनीही पेट घेतला. या घटनेत मीराबाई गंभीरपणे भाजल्या गेल्या तर संतोष भिल ५५ टक्के भाजला गेला. उपचारादरम्यान सोमवारी मीराबाईचा मृत्यू झाला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now