⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

‘डोळ्यात कालचे पाणी’ कवितेने रसिक अंतर्मुख

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२ । उदगीर येथे २२ रोजी येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनातील निमंत्रित कवींच्या कविसंमेलनात मनोहर आंधळे यांनी ‘डोळ्यात कालचे पाणी’ ही कविता सादर करून त्यांनी उपस्थितांना अंतर्मुख केले.आजकाल नवविवाहितांच्या किरकोळ भांडणामुळे अनेकांचे संसार मोडतात, अशा तरुण-तरुणींचे मनोगत आपल्या कवितेत मांडताना कवी मनोहर आंधळे, यांनी रसिकांच्या डोळ्यात पाणी आणले.

विश्वास वसेकर(ठाणे) हे कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. भारत सातपुते (लातूर) यांनी सूत्रसंचलनातून प्रत्येक निमंत्रित कवींचा परिचय दिला. या संमेलनास कवी डी.बी.जगत्पुरिया, संजीवनी तडेगावकर, उद्धव कानडे, मंदाकिनी पाटील, अनिता येलमटे, रवींद्र कांगणे, सूर्याजी भोसले, विलास कुवळेकर, केशव खटिंग, देविदास फुलारी, हबीब भंडारे, वीरा राठोड, विशाल इंगोले व योगिराज माने या कवींनी एकापेक्षा एक सरस कविता सादर करत संमेलनाची उंची वाढवली. सहभागी सर्व कवींना सन्मानपत्र देण्यात आले.