जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२२ । राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यावरून सध्या वाद सुरू आहे. काॅलेज आणि शाळा ऑनलाईन पध्दतीने झाल्या आहेत तर मग परीक्षा कशी ऑफलाईन? असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करीत आहेत. त्यातच आजपासून बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हॉलतिकीट मिळणार आहे. यामुळे आता एकच गोंधळ विद्यार्थ्यांमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक भागांमध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेसाठी आंदोलने देखील केली होती.

ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी बोर्डावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपला निर्णय बदलला नाही. परीक्षा ऑफलाईनच होणार हे अगोदर शिक्षणमंत्र्यांनी आणि मंगळवारी बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर हॉलतिकीट बाबत माहिती देण्यात आली आहे. यामुळे आता राज्यातील विद्यार्थ्यांना ऑफलाईन परिक्षेशिवाय पर्याय नाही असे दिसते. कोरोनाच्या महामारीचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळेच परीक्षा ऑनलाईन घ्यावी अशी मागणी होती. दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा याआधीच जाहीर केल्या असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाला आणि परीक्षेच्या नियोजनाला पुरसा वेळ मिळाला आहे, असे बोर्डाकडून सांगण्यात येत आहे.

ऑफलाईन पध्दतीनेच बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. हे आता निश्चित झाले आहे. मात्र, खरा प्रश्न येतो तो म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा. कारण गेल्या दोन वर्षांपासून जवळपास ऑनलाईन पध्दतीनेच काॅलेज झाले आहे. हातावर मोजण्या इतक्याच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अभ्यासाचे धडे घेतले आहेत. त्याचे कारण म्हणजे ग्रामीण भागामध्ये नेटवर्क आणि स्मार्टफोन विद्यार्थ्यांकडे नव्हते. त्यातुलनेत शहरी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहचले. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थी या बारावीच्या परीक्षेला कशाप्रकारे सामोरे जातील हा मोठा विषय आहे. तसेच बहुतांश एसटी बस बंद असल्याने परीक्षेला ये-जा करण्याचा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे.
सध्या तरी ऑफलाईन परीक्षा निश्चित असून नंतर काही निर्णय बदलला तरच विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.
हे देखील वाचा :
- सातपुड्यातील मनुदेवी मंदिरात चोरट्यांचा डल्ला; १.३५ लाखांचा ऐवज लंपास
- भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांसाठी मेगाभरती; ग्रॅज्युएट्स तरुणांना नोकरीची संधी..
- प्रवाशांनो लक्ष द्या! भुसावळ–दादर खान्देश एक्सप्रेस ‘या’ स्थानकावरून सुटणार?
- जळगावात ९ ऑगस्टला ‘न्याय विश्वास फाउंडेशन’तर्फे मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
- ‘गोवंशाची कत्तल केली’ म्हणत ५ लाखांची मागणी; चोपड्याच्या दोघा तोतया पत्रकारांवर गुन्हा












