⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

हृदयद्रावक : लेकीच्या उपचारासाठी बापाने काढल दीड लाखांचं कर्ज, चोरटयांनी तेही केलं लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२२ ।चोपडा शहरात त्र्यंबकनगर भागातील रहिवासी संतोष सोनवणे यांच्या घरात दुपारी १ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनीडल्ला मारला. चोरट्यांनी घरातील तब्बल ५ तोळे सोने आणि ८० हजार रुपयांची रोकड लंपास केली. विशेष म्हणजे सोनवणे यांनी आपल्या मुलीच्या उपचारासाठी बुधवारी दीड लाख रुपयांचे कर्ज सोसायटीच्या माध्यमातून घेतले होते. तेचे पैसे चोरट्यांनी लांबवले आहेत.

त्यानंतर थोड्या वेळाने दोन वाजेच्या सुमारास अवघ्या एक किमी अंतरावरील सहकार कॉलनीतील रहिवासी कैलास रामदास वाघ यांचे बंद घराचे कुलूप तोडून चोरटे आत शिरले. तसेच कपाटाचे कुलूप तोडून ७ तोळे सोने आणि १ लाख ७५ हजार रुपयांची रोकड घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. एकाच दिवशी भरदिवसा दोन ठिकाणी घरफोड्या करून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे.

चोपडा शहरातील त्र्यंबकनगर आणि सहकार कॉलनी या दोन ठिकाणी गुरुवारी भरदिवसा घर फोडी केली. त्यांनी केलेल्या या कृत्यामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे. यावेळी दोन्ही घरातून तबब्ल १२ तोळे सोनं आणि अडीच लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. यातील सर्वात हृदय द्रावक घटना म्हणजे मुलीच्या उपचारासाठी सोसायटीमधून कर्ज काढलं होत. चोरट्यांनी ते कर्जही लंपास केल .