Sunday, December 4, 2022

Taarak Mehta : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’तील भाभीचा बोल्ड अवतार पाहिला का? साडी नव्हे तर..

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२२ । देशभरात घराघरात प्रसिद्ध असलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये सध्या चांगलाच गोंधळ सुरू आहे. काही दिवसापूर्वीच सर्वांच्या आवडत्या दया बेनचे पुनरागमन होत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. दुसरीकडे दुसरीकडे अनेक महत्त्वाच्या व्यक्तिरेखा शो सोडत असल्याच्या बातम्यांनी आणखी गोंधळ घातला आहे. मालिकेतील प्रमुख व्यक्तिरेखा असलेले तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढा यांनी १४ वर्षानंतर मालिकेचा निरोप घेतला. तारक मेहता मालिकेतून आउट होताच त्यांच्या पत्नी म्हणजेच अंजली तारक मेहताची भूमिका साकारणाऱ्या सुनयना फौजदार सध्या सोशल मीडियात धूम करीत आहे. सुनैनाने तिच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर चाहत्यांना घायाळ केले आहे. अंजली भाभी साडीवर नव्हे तर क्रॉप टॉपवर दिसून येत आहे.

- Advertisement -

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये सध्या सर्वच सावळा गोंधळ सुरु आहे. कुणी येतेय तर कुणी जातेय अशा बातम्या कानावर येत आहेत. मालिकेतील मुख्य पात्र म्हणजेच शैलेश लोढा यांनी शो सोडल्यापासून सट्टा बाजार देखील तेजीत आहे. शैलेश लोढा परतणार कि नाही यावर डाव खेळले जात आहेत. शैलेश शोमध्ये परतणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नसून असित मोदीनेही या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टपणे काहीही सांगितले नाही. ‘तारक मेहता’च्या ताज्या एपिसोडमध्ये त्याने दयाबेनचे पुनरागमन दाखवले आहे. सुंदरलाल आपल्या बहिणीसोबत गोकुळधाम सोसायटीत पोहोचला आहे. एकंदरीत सर्व आनंदी आनंद असल्याचे त्यात दिसते.

मालिकेतील सर्वात हास्यास्पद आणि सर्वांना हसविणारे पात्र म्हणजे टप्पू. सध्या टप्पूची भूमिका राज अनाडकट साकारत आहे. शैलेश लोढासोबतच राज अनाडकटही शो सोडण्याच्या तयारीत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. टप्पू, टप्पू के पापा आणि टप्पू कि मम्मी अबालवृद्धांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची कला त्यांना चांगलीच अवगत आहे. तारक मेहतामध्ये कौटुंबिक वातावरणात असलेले बहुतांश पात्र सोशल मीडियात चांगलेच बोल्ड आणि सक्रिय आहेत.

- Advertisement -

गेल्या वर्षी सुनयना फौजदारने तारक मेहतामध्ये अंजली मेहताची भूमिका साकारली होती. तेव्हापासून लोक त्यांची स्टाइल खूप पसंत करत आहेत. गेल्या काही दिवसात सुनयना यांनी सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. शॉर्ट्स आणि क्रॉप टॉपमध्ये सुनयना खूपच सुंदर दिसत आहे. ब्लॅक फ्लोरल प्रिंट श्रगसह सुनैनाचे स्माईल ते आणखीनच आकर्षक बनवत आहे. सुनयना सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, ती तिच्या सिझलिंग फोटोंनी इंस्टाग्रामवर धुमाकूळ घालत असते.

- Advertisement -
[adinserter block="2"]