गुन्हेजळगाव जिल्हाजळगाव शहर

बनावट आरटीपीसीआर : डाटा ऑपरेटरच्या जामीन अर्जावर पोलिसांची हरकत

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२२ । “शावैम” व रुग्णालयातून तपासणी न करताच बनावट आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल तयार करून देणारा डाटा ऑपरेटरने सुरक्षारक्षक संगनमत करून अनेक लोकांना कोणतीही चाचणी न करता बनावट आरटीपीसीआर रिपोर्ट दिले. त्यामुळे त्याला अटक करून सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. त्याला अटकपूर्व जामीन देऊ नये असे लेखी म्हणणे जिल्हापेठ पोलिसांनी बुधवारी न्यायालयात सादर केले.

crime 18 jpg webp

दुर्गे याने महत्त्वाची माहिती पोलिसांना दिली आहे. या गुन्ह्यात बेपत्ताने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असून, त्यावर बुधवारी पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांनी लेखी म्हणणे सादर केले. बेपत्ताकडे गुन्ह्याबाबत अधिक माहिती आहे. दुर्गेच्या सांगण्यानुसार १०० लोकांना बनावट रिपोर्ट दिले आहेत. त्या शिवाय बेपत्ताने अनेक लाेकांना असे रिपोर्ट दिल्याचा संशय आहे. यासाठी त्याची अटक पोलिसांना आवश्यक आहे. अटक करून चाैकशी करायची असल्याचे कारण पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहे. त्यावर न्यायाधीश व्ही. बी. बोरा यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button