जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२२ । पारोळा तालुक्यातील टोळी येथे क्षुल्लक कारणावरून विवाहितेस ५ रोजी सायंकाळी ७ वाजता मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ८ रोजी पाराेळा पाेलिसांत गुन्हा दाखल झाला.
अधिक माहिती अशी की, पीडित महिला घरात स्वयंपाक करत असताना घराजवळ राहणारे भागवत भानुदास पाटील हे आरोळ्या मारत घरासमोरील खाटा फेकत होते. त्याचा जाब विचारल्याने भागवत पाटील यांनी पीडित महिलेला मारहाण करत मला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच घरा लगतची भिंत पाडून अंगणातील एकलव्य यांच्या पुतळ्याची विटंबना केली. याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून तपास उपविभागीय अधिकारी राकेश जाधव करत आहेत.
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज