---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर महाराष्ट्र राजकारण

गुलाबराव पाटलांना मंत्रिपद संजय राऊत यांच्यामुळेच मिळाले ! – संजय सावंत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२३ । जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे वेळोवेळी संजय राऊत यांच्यावर टीका करत आहेत. मात्र मंत्रीपद मिळवण्यासाठी किती वेळा त्यांनी संजय राऊत यांच दार ठोठावल आहे हे गुलाबराव पाटील विसरले आहेत. आज खा. संजय राऊत यांच्यावर टीका करणारे गुलाबराव पाटील यांना मंत्रीपद संजय राऊत यांनीच दिलं होतं असा गौप्यसफोट संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केला.

sanjay sawant gulabrao patil

यावेळी संजय सावंत म्हणाले की, मंत्री गुलाबराव पाटील हे वणीच्या सप्तशृंगी देवीचे उपासक आहेत. दर वाढदिवसाला ते नेहमीच त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात त्यांनी देवीच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं किमी संजय राऊत यांच्यामुळे मंत्री झालेलो नाही. असा आव्हान संजय सावंत यांनी गुलाबराव पाटील यांना दिला आहे.

---Advertisement---

आपल्या भाषणात पुढे ते म्हणाले की, गुलाबराव पाटलांनी आपली पात्रता तपासावी आणि मग संजय राऊत यांच्यावर आरोप करावे. आपण ज्यांच्या जीवावर मोठे झालो आहोत त्यांच्यावर आपण आरोप करू शकतो काय़ हे गुलाबराव पाटील यांनी तपासावे. आणि मग निष्ठेच्या गोष्टी कराव्या असेही ते म्हणाले

याचबरोबर ते असेही म्हणाले की, संपर्कप्रमुख म्हणून मी गुलाबराव पाटील यांच्यासोबत काम केलं आहे. त्यांचे अनेक किस्से अनेक गोष्टी मला माहित आहेत. जर गुलाबराव पाटील शांत झाले नाहीत तर असे गौप्य स्पोट मी करतच राहील.

शिरसोली येथे जिल्हा परिषद गट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये संजय सावंत यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना हा गौप्यस्पोट केला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, विधानसभा संपर्कप्रमुख चंद्रकांत आसबे, युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, विभागीय सचिव विराज गावडीया, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश पाटील, धरणगाव तालुकाप्रमुख लीलाधर पाटील, विजय लाड, भागवत पाटील, मुरलीधर रघुवंशी, राहुल बोराडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना तालुकाप्रमुख उमेश पाटील यांनी केले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---