⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | गुन्हे | केंद्रीय जीएसटी पथकाची पहूरला धाड; स्टील कंपनीच्या पत्त्यावर होते मेडिकल!

केंद्रीय जीएसटी पथकाची पहूरला धाड; स्टील कंपनीच्या पत्त्यावर होते मेडिकल!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथे वस्तू व सेवाकर (जीएसटी) गुप्तचर महासंचालनालयाच्या पथकाने धाड टाकली आहे. दरम्यान यावेळी केलेल्या चौकशीत एका स्टील कंपनीच्या पत्त्यावर मेडिकल सुरु असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी कि, जीएसटी घोटाळ्याशी संबंधित हे धाडसत्र होते. त्यानुसार एका स्टील कंपनीच्या जीएसटीच्या पत्त्यावर चक्क मेडिकल सुरु असल्याचे आढळून आले. तर अन्य एकाला आपल्या नावावर स्टील कंपनी असल्याचे माहितच नव्हते. दरम्यान, याप्रकरणी डीजीजीआयच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले असल्याचे कळते.

आयकर भरणारे एम/एस कृष्णा स्टील (GSTIN 27BXRPK1228BIZM) आणि ए.एस. स्टील (GSTIN 27KENPS0948A1Z5) या दोघं कंपनीचा नोंदणीकृत पत्ता हा १३७३, संतोषी माता नगर पहूर पेठ, पहूर असा होता. अधिकाऱ्यांनी कृष्णा स्टीलचे मालक प्रवीण विठ्ठल कुमावतशी मोबाईलवरून संवाद साधला. तेव्हा त्यांना कळले की, ए.एस स्टीललॅडचे अशोक सखाराम सुरवाडे हे मालक आहेत. अधिकाऱ्यांनी प्रवीण कुमावतची चौकशी केल्यावर त्याने सांगितले की, कृष्णा स्टील ही फर्म पिंटू इटकारेने माझ्या नावावर तयार केली. तसेच या मोबदल्यात त्याने मला ८ महिने ८ ते १२ हजार रुपये महिना देत होता.

दरम्यान, अशोक सुरवाडे याने अधिकाऱ्यांना सांगितले की, ए.एस स्टील या कंपनीचा संचालक असल्याबाबत बाबत आपल्याला काहीच माहित नाही. तर कैलास भारुडे याने सांगितले की, तो साई इंटरप्राईजेसचा संचालक आहे. परंतू ही फर्म त्याचा शालक पिंटू इटकारे याने बनविली होती. भारुडेने पुढे सांगितले की, सुरेशचंद्र हुकुमचंद्र जाधवानी हा सर्व कटाचा मुख्य लाभार्थी तसेच मुख्यसूत्रधार आहे. तसेच पिंटू हा जाधवानी आणि ओम प्रकाश सचदेव यांच्या सुचनेनुसार सर्व काम करत होता.

author avatar
Tushar Bhambare