⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

सिमेंट स्वस्त होणार ! GST परिषद घेऊ शकते मोठा निर्णय..

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ फेब्रुवारी २०२३ । देशातील सिमेंटच्या (Cement) किमतीत सातत्याने होत असलेली वाढ रोखण्याची अपेक्षा आहे. कोरोना काळानंतर सिमेंट दरात भरमसाठ वाढ झालेली आहे. आता अशातच सिमेंटचे दर घसरण्याची शक्यता आहे. कारण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्यानंतर आता केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे (CBIC) अध्यक्ष विवेक जोहरी यांनी सिमेंटवर दिलासा देण्याचे संकेत दिले आहेत.

जोहरी यांनी सांगितले की, फिटमेंट कमिटी सिमेंटवरील जीएसटी (GST) दरांचा आढावा घेईल. 18 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत सिमेंटबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे मानले जात आहे. सध्या सिमेंटवर २८ टक्के जीएसटी लागू आहे. जीएसटीचा दर खूप जास्त असून तो कमी करायला हवा, असे सिमेंट उद्योगाचे म्हणणे आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी संकेत दिले होते की, सिमेंटवरील जीएसटी दर कमी करण्याच्या उद्योगाच्या मागणीवर सरकार गांभीर्याने विचार करत आहे. आता आगामी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत सिमेंटवरील जीएसटीवर चर्चा होणार असल्याचे जोहरी यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.

28 टक्के GST आकारला जातो
सध्या देशात सिमेंटवर २८ टक्के जीएसटी आकारला जातो. बांधकाम क्षेत्रात सिमेंट हा महत्त्वाचा घटक असल्याचे सिमेंट उद्योग सांगतो. हे असे उत्पादन आहे, जे देशातील प्रत्येक व्यक्ती वापरते. २८ टक्के जीएसटी लागू झाल्याने सिमेंट महाग झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने सिमेंटवरील जीएसटी दर कमी करावा.