जळगाव जिल्हाजळगाव शहर

महाराजा सयाजीराव गायकवाड यांना अभिवादन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२२ । थोर समाज सुधारक बडोदा संस्थानचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या स्मृतिदिनानिमित्त संविधान जागर समितीतर्फे अभिवादन करण्यात आले.

जनसेवा विचारधारा फाउंडेशनने गोलाणी मार्केट येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संविधान जागर समितीचे संयोजक भारत ससाणे यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची ओळख करून दिली. आपल्या संस्थानात सामाजिक समतेचा विचार रुजवून त्यांनी अनेक अनिष्ट रूढी परंपरा बंद केल्या.

प्रास्ताविक जनसेवा विचारधारा फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश बोरा यांनी केले. यावेळी कमलाकर इंगळे, समीर सोनवणे,कुणाल चौधरी, हरीश अंबुरे, फिरोज शेख, बाळकृष्ण पाटील, शेखर देशमुख, लक्ष्मण पाटील, चेतन जाधव, मुकेश कुरील, अमित आहुजा, हरीश कुमावत, भाविन मेहता, विनय निंबाळकर, जितेंद्र वाणी, सागर गवळी, मोहन माळी, प्रदीप राजपूत आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button