जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मेडियम स्कूल भुसावळ येथे चिमुकल्यांचा पदवीग्रहण सोहळा हा उपक्रम पार पडला. पदवीग्रहण सोहळा म्हटले की महाविद्यालयीन तरूण तरूणी डोळयासमोर येतात. पण भुसावळच्या पालक व चिमुकल्यांनी पदवीग्रहण सोहळा नुकताच अनुभवला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने प्रमुख अतिथी डॉ.सौ. उल्हास पाटील, सावदा स्कूल सावदा च्या मुख्याध्यापिका सौ. भारती पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा पाटील हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे सुरु असलेले कृतियुक्त शिक्षण पद्धतीचे कौतुक करत शुभेच्छा व्यक्त केल्यात. यानंतर नुत्यकला सादर करण्यात आल्यात.
प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सिनियर के.जी.च्या विद्यार्थ्यांचा पदवीप्रदान समारंभ प्री ग्रॅज्युएशन संमारभ उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी बालकांनी व पालकांनी शाळेविषयी भावना व्यक्त केल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अनघा पाटील यांनी चिमुकल्यांशी संवाद साधला.