विद्यापीठातील जलतरण तलावाचे राज्यपालांच्या हस्ते उदघाटन

फेब्रुवारी 28, 2022 6:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२२ । महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे दोन दिवसाच्या जळगाव दौऱ्यावर आहेत. रविवारी सायंकाळी त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते वाहनाने जैन हिल्सकडे रवाना झाले. व या नंतर दुसऱ्या दिवशी राज्यपाल यांची भेट कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात होती.

talav

यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जलतरण तलावाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, विद्यापीठाचे प्र. कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्यासह विद्यापीठातील विविध शाखांचे प्रमुख, सिनेट सदस्य उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now