---Advertisement---
वाणिज्य

सरकारचा अरब अमीरातीला 10000 टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय ; शेतकऱ्यांना फायदा होणार का?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२४ । सध्या कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण होत असून त्यातच कांद्याच्या निर्यातीवर बंदी असलयाने कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे. मात्र अशातच सरकारने संयुक्त अरब अमिराती (UAE) ला 10,000 टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली.परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) याबाबतचे आदेश जारी केलेत. दरम्यान, या निर्णयाचा शेतकऱ्यांना किती फायदा होणार असा सवाल उपस्थित केला जातोय.

onion

याबाबत तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार,कांद्याची निर्यात ही मर्यादीत आहे, त्यामुळं सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यंना फारसा फायदा होणार नल्याची माहिती तज्ज्ञांनी दिलीय. सध्या अनेक शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा आहे. मात्र, निर्यातबंदीमुळं दराच घसरण झालीय. आता काही प्रमाणात निर्यात करण्यात येणार आहे, मात्र ती देखील मर्यादीत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना याचा फार काही फायदा होईल असं वाटत नसल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

---Advertisement---

सरकारनं का केली निर्यातबंदी?
अल निनोच्या प्रभावामुळं मागील वर्षी पावसाचं प्रमाण कमी राहिलं आहे. यामुळं अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीय. तसेच दुसरं कारण म्हणजे देशातील बाजारात स्वस्त दरात कांदा उपलब्ध व्हावा हा सरकारचा उद्देश आहे. किंमतीवर निंयत्र राहावं यासाठी सरकारनं खबरदारी म्हणून कांद्याची निर्यातबंदी केली आहे. मात्र, या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. 4000 रुपये प्रतिक्विंटलवर आलेला दर सध्या 800 ते 1200 रुपयांच्या दरम्यान आला आहे. यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---