⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘गुड न्यूज’, तुमच्यासाठी उद्या जळगावात मोफत सेमिनार!

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२२ । सध्याचे युग हे स्पर्धेच असून १०वी व १२वी नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच आयोगाच्या बदललेल्या अभ्यासक्रम आणि वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षा पद्धतीनुसार तयारी कशी करावी? व वकल्पिक विषयाची निवड कशी करावी? याबाबत मागर्दशन करण्यासाठी द युनिक अकॅडमी, पुणे, शाखा जळगांव यांच्या वतीने शनिवार दि. १३ रोजी सकाळी ११ वाजता अग्रवाल हॉल, व. वाचनालय, रेल्वे स्टेशन जवळ, जळगांव येथे मोफत सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, स्पर्धाबाबत युनिक प्रकाशित सर्व पुस्तके ४० टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध असणार आहे. तरी इच्छूक विद्यार्थ्यांनी या सेमिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन द युनिक अकॅडमी शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

तुकाराम जाधव (संचालक, द युनिक अकॅडमी, पुणे) हे मार्गदर्शन म्हणून असणार आहेत. सध्याचे युग हे स्पर्धेच असून १०वी व १२वी नंतर बरेच विद्यार्थी स्पर्धाकडे वढतात. परंतु, त्यांना स्पर्धाबाबत पुरेशी माहिती नसते व त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते. तसेच UPSC/MPSC परीक्षेत नवीन बदल झाले असून या नवीन बदलांना कसे सामोरे जावे, याबाबत मार्गदशन मिळावे. यासाठी द युनिक अकॅडमी, पुणे, शाखा जळगांव यांच्या वतीने सदर मोफत सेमिनार आयोजित करण्यात आले आहे. तरी १०वी व १२वी नंतर स्पर्धा परीक्षांसाठी इच्छूक विद्यार्थ्यांनी व UPSC/MPSC तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सदर मोफत सेमिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन द युनिक अकॅडमी, पुणे, शाखा जळगांव च्या वतीने करण्यात आले आहे. तसेच इच्छूक विद्यार्थ्यांनी विनामूल्य लेक्चर पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर आपले नाव नोंदणी करावे.

वैशिष्ट्ये
आयोगाच्या बदललेल्या अभ्यासक्रम आणि वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षा पद्धतीनुसार तयारी कशी करावी?
वकल्पिक विषयाची निवड कशी करावी ?
10 वी 12 वी नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी ?

विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदणी करा.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeQZq06mA7UskGgPbf3h5CS1jAIMsTyhT4LlHCbmwmJXEQFqQ/viewform?usp=sf_link