ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी ! आज सोन्याचे दर घसरले, पहा नवीन दर?

मे 9, 2026 1:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे त्रस्त ग्राहकांसाठी आज दिलासादायक बातमी आली आहे. आज सोन्याचे दर घसरले आहेत. सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३३० रुपयांनी घसरले आहेत. आज सोने काहीसे स्वस्त झाल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

gold

२४ कॅरेट सोन्याचे दर
आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३३० रुपयांची घसरण होऊन ते १,५२,३५० रुपयावर पोहोचले आहे. ८ ग्रॅममागे सोनं २६४ रुपयांनी घसरून १,२१,८८० रुपये झाले आहेत. सोबतच २२ कॅरेट सोन्याच्या दरात ३०० रुपयांची घसरण झाली असून हे दर १,३९,६५० रुपये झाले आहेत. तर १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २५० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,१४,२६० रुपये झाले आहे.

दुसरीकडे आज चांदीचा दर स्थिर दिसून आला. मागील तीन दिवसात चांदी दरात प्रति किलो तब्बल २० हजार रुपयांची वाढ झाली आहे. मात्र आज चांदी दरात कोणतीही वाढ अथवा घट झाली नाहीय. यामुळे आज चांदीचा एक किलोचा दर २,७५,००० रुपये इतका आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now