ग्राहकांसाठी आनंदवार्ता ! सराफ बाजार उघडताच सोने-चांदीत मोठी घसरण; खरेदीला जाण्यापूर्वी वाचा आताचे दर?

जून 8, 2026 11:12 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२६ । जागतिक स्तरावर अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे महागाई वाढत असली, तरी भारतीय सराफ बाजारातून ग्राहकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच सोमवारी सकाळी बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर १०४० रुपयांनी (प्रति १० ग्रॅम/तोळा) घसरले आहेत, तर चांदीच्या दरात तब्बल ५००० रुपये प्रति किलोची घसरण झाली आहे. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. तुम्हीही आज सोने खरेदीचा विचार करत असाल, तर १८, २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे आजचे ताजे भाव नक्की जाणून घ्या… Gold Silver Rate Today

gold silver 1 jpg webp

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव सराफ बाजारात आज सकाळी २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १०४० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी तु्म्हाला १,५१,६९० रुपये खर्च करावे लागतील. तर २४ कॅरेटचे १० तोळा सोनं १०४०० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १५,१६,९०० रुपये मोजावे लागतील.

तसेच २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये आज ९५० रुपयांची घसरण होऊन १,३९,०५० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. २४,२२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरामध्ये देखील मोठी घसरण झाली आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ७८० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,१३,७७० रुपये खर्च करावे लागतील.

आज सोन्यापाठोपाठ चांदी दरातही मोठी घसरण झाली आहे. चांदी दरात प्रति किलो ५००० रुपयापर्यंतची घसरण झाली असून यामुळे आता एक किलो चांदीसाठी २,६०,००० रुपये खर्च करावे लागतील.

दरम्यान, लग्न सराई किंवा सणासुदीच्या काळात सोन्याचे दर अनेकदा कडाडलेले असतात. मात्र, आज सोन्याच्या दरात झालेली ही मोठी घसरण ग्राहकांसाठी एक ‘सुवर्णसंधी’ मानली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now