ग्राहकांसाठी खुशखबर! रक्षाबंधनाच्या दिवशी सोनं-चांदीत मोठी घसरण, नवीन दर तपासून घ्या

ऑगस्ट 28, 2026 12:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, सोन्याच्या दरात ३ हजार रुपयांहून अधिकची घट झाली असून चांदीही स्वस्त झाली आहे. त्यामुळे आज बहीण किंवा भावासाठी सोनं-चांदी खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही चांगली संधी मानली जात आहे.

gold silver

२४ कॅरेट सोनं ३,१६० रुपयांनी स्वस्त

‘गुड रिटर्न्स’ने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या १ तोळा दरात ३,१६० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे १ तोळा २४ कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना १,५९,८२० रुपये मोजावे लागतील.

२२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दरही घसरले

२४ कॅरेटपाठोपाठ २२ कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. १ तोळा २२ कॅरेट सोनं आज २,९०० रुपयांनी स्वस्त झाले असून त्यासाठी ग्राहकांना प्रति १० ग्रॅमसाठी १,४६,५०० रुपये मोजावे लागतील.तर १८ कॅरेट सोन्याच्या दरात २,३७० रुपयांची घसरण झाली असून, त्याचा आजचा दर १,१९,८७० रुपये आहे.

चांदीही ५ हजार रुपयांनी स्वस्त

सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. १ किलो चांदीच्या दरात तब्बल ५ हजार रुपयांची घट झाली असून, आज १ किलो चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना २ लाख ५५ हजार रुपये मोजावे लागतील.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now