सणासुदीपूर्वी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; जळगावच्या सराफा बाजारात भाव काय?

ऑगस्ट 18, 2026 11:25 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । रक्षाबंधन, गौरी-गणपती यांसारखे सण जवळ आले असताना सोन्या-चांदीच्या किंमती पुन्हा उसळी घेताना दिसत आहे गेल्या काही दिवसांपासून याच्या किंमती वाढत असून दोन दिवसांत चांदी ४ हजार रुपयांनी वधारली. यामुळे (१७ऑगस्ट) चांदी २ लाख ३९ हजार रुपयांवर पोहोचली. दोन दिवसांत सोन्याच्या भावात २ हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ते १ लाख ५४ हजार ५०० रुपयांवर पोहोचले.

goldsilver

३ ते १३ ऑगस्ट या दरम्यान सतत सोने-चांदीच्या भावात वाढ झाली. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी चांदीच्या भावात ५ हजार रुपयांची घसरण होऊन ती २ लाख ३५ हजार रुपयांवर आली होती. त्यानंतर १५ रोजी त्यात ३ हजार रुपयांची वाढ होऊन ती २ लाख ३८ हजार रुपयांवर पोहोचली. १६ रोजी याच भावावर स्थिर राहिल्यानंतर १७ रोजी १ हजार रुपयांची वाढ होऊन चांदी २ लाख ३९ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली.

अशाच प्रकारे १४ ऑगस्ट रोजी १०० रुपयांची घसरण होऊन सोने १ लाख ५२ हजार २०० रुपयांवर आले होते. १५ रोजी १ हजार ७०० रुपयांची वाढ होऊन ते १ लाख ५३ हजार ९०० रुपयांवर पोहोचले. १६ रोजी याच भावावर स्थिर राहिल्यानंतर १७ रोजी ६०० रुपयांची वाढ होऊन सोने १ लाख ५४ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.

सोने-चांदीच्या दरातील या सततच्या चढ-उतारामुळे सराफा बाजारात पुन्हा तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि मागणीच्या आधारे मौल्यवान धातूंच्या दरात आणखी बदल होण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now