सोन्याने ओलांडला 56 हजाराचा टप्पा ; आज सोने-चांदी किती रुपयांनी महागले? घ्या जाणून

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२३ । मजबूत जागतिक संकेतांमुळे आज भारतीय वायदे बाजारात सोन्याची किंमत 56 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेली आहे. सोने 56,200 रुपयांच्या विक्रमी पातळीपासून काही पावले दूर आहे. दरम्यान, आगामी दाेन महिन्यात‎ चांदीचे प्रति किलाेचे दर ८०‎ हजारांपर्यंत पाेहाेचण्याचा अंदाज‎ व्यापारी वर्गाकडून वर्तवला आहे.‎ Gold Silver Rate Today

आज सोमवार, 9 जानेवारी रोजी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा सकाळी 09:20 पर्यंत 328 रुपयांनी वाढून 56,071 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत होता. आज सोन्याचा भाव रु.55,800 वर उघडला. उघडल्यानंतर एकदा किंमत रु. 56110 वर गेली. गेल्या ट्रेडिंग सत्रात एमसीएक्सवर सोन्याचा भाव 440 रुपयांनी वाढून 55,730 रुपयांवर बंद झाला होता.

चांदीच्या किमतीत जोरदार वाढ
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज चांदीचा दर 4311 रुपयांनी वाढून 69,586 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. चांदीचा भाव आज 69,500 रुपयांवर उघडला. किंमत एकदा 69,670 रुपयांवर गेली. पण, काही काळानंतर तो 69,586 रुपयांवर व्यवहार करू लागला. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात एमसीएक्सवर चांदीचा भाव 1,100 रुपयांनी वाढून 69,178 रुपयांवर बंद झाला.

दरम्यान, साेने- चांदीच्या दरात सातत्याने वाढ‎ हाेत आहे. गेल्या ३ जानेवारीला ७०‎ हजार प्रति किलाेवर चांदी पाेहाेचली‎ हाेती. त्यानंतर घसरण हाेत ६७‎ हजारांवर स्थिरावली असताना पुन्हा‎ ७० हजारांकडे वाटचाल सुरु झाली‎ आहे. दरम्यान, आगामी दाेन महिन्यात‎ चांदीचे प्रति किलाेचे दर ८०‎ हजारांपर्यंत पाेहाेचण्याचा अंदाज‎ व्यापारी वर्गाकडून वर्तवला आहे.‎

गेल्या दाेन महिन्यात ६० ते ६२‎ हजार रुपये प्रति किलाे असणारी‎ चांदी २ डिसेंबर राेजी यंदाच्या‎ उच्चांकी ६५ हजारांवर पाेहाेचली‎ हाेती. त्यानंतर १६ डिसेंबर राेजी ६७‎ हजार १०० रुपयांपर्यंत वाढली.‎ त्यानंतर दरराेज ३०० ते ५०० रुपयांची‎ वाढ हाेत ३ जानेवारीला गेल्या दाेन‎ वर्षांतील उच्चांकी ७० हजारांचा‎ टप्पा गाठला. शुक्रवारी ६८ हजार‎ असलेले दर ८०० रुपयांनी वाढून ती‎ ६८८०० रुपये प्रति किलाेवर‎ पाेहाेचली. ही दरवाढ सुरु राहण्याचा‎ अंदाज व्यापारी वर्गांकडून वर्तवला‎ जात असून ती काेराेना काळातील‎ ७३ हजार रुपये प्रति किलाेचा‎ उच्चांक माेडेल असे शहरातील‎ जाणकार सराफांना वाटते आहे.‎