⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

चालू आठवड्यात सोने महागले, तर चांदी घटली, काय आहेत आजचे दर?

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । गेल्या काही दिवसापासून सोने (Gold Rate) आणि चांदीच्या (Silver Rate) दरात चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळाले. काल आठवड्याच्या शेवटच्या दिवशी जळगाव सराफ बाजारात सोने ३०० रुपयाने महागले होते. त्यामुळे सोन्याचा प्रति तोळ्याचा दर ५३ हजारांवर गेला आहे. तर चांदी ४७० रुपयाने महागली होती.

जळगाव सुवर्ण नगरीत सध्या २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५३,११० रुपये इतका आहे. तर चांदी ६८,३३० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

या चालू आठवड्यात सोने ३ वेळा महागले आहे तर दोन वेळा स्वस्त आले आहे. या आठवड्यात सोने जवळपास ३०० ते ३५० रुपयांनी महागले आहे. मात्र दुसरीकडे चांदीच्या दरात घट दिसून आलीय. चांदीच्या दरात ८०० रुपयापर्यंत ची घट दिसून आलीय. कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊननंतर गेल्या महिन्यात रशिया आणि युक्रेन युद्ध पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीमध्ये तेजी दिसून आली होती. युद्धादरम्यान, सोन्याचा भाव ५५६०० रुपयांवर गेला होता. तर कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊन मध्ये सोने दर ५६,२०० रुपये प्रति तोळ्यावर गेला होता. मात्र त्यानंतर त्यात मोठी घसरण झाली आहे.

या आठवड्यातील दर?
जळगावमध्ये ४ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५२,५५० रुपये होते. तर ५ एप्रिल रोजी ५२,७४०, ६ एप्रिल रोजी ५२,५८०, तर ७ एप्रिल ५२,८१० व ८ एप्रिल ला ५३,११० रुपयावर होता. तर दुसरीकडे ४ एप्रिल रोजी चांदी दर ६८,३०० प्रति किलो होती. ५ एप्रिल ६७,८५०, ६ एप्रिल ६७,७५० तर ७ एप्रिल ला ६७,८६० तर ८ एप्रिल ला ६८,३३० प्रति किलो इतका होता.