खुशखबर..! सोने पुन्हा 54 हजाराच्या घरात, आज किती रुपयांनी घसरले सोने-चांदी?

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२३ । सोने चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. आज आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. मागील काही दिवसापासून 55 हजाराच्यावर असलेला सोन्याचा दर आज घसरून 54 हजाराच्या घरात आला आहे. Gold Silver Rate Today

मल्टी कमोडिटी एक्सचेंज आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोने प्रति 10 ग्रॅम 100 रुपयांनी घसरले आहे. त्यामुळे सोने 54,922 रुपये प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे. यापूर्वी काल बाजार बंद होता मात्र मागील बंद 55,022 रुपयांवर नोंदवला गेला होता. येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात काही हालचाल होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे आज चांदी 396 रुपयांनी स्वस्त झाली आहे. यामुळे चांदीचा एक किलोचा दर 61,810 रुपयांवर व्यवहार करत आहे. मागील बंद 62,206 रुपयांवर नोंदवला गेला होता.

जळगाव सुवर्ण नगरीतील दर?
जळगाव सुवर्ण नगरीत 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 56,100 रुपये प्रति तोळा इतका आहे. तर दुसरीकडे चांदी अंदाजित 64500 रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान गेल्या महिन्यातील 2 फेब्रुवारीला जळगाव सराफ बाजारात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 58,300 विना जीएसटीसह (GST सह जवळपास 59000) विक्रमी पातळीवर गेला होता. मात्र त्यात आतापर्यंत मोठी घसरण दिसून येतेय.

म्हणजेच काय तर गेल्या महिन्याभरात सोन्याच्या दरात जवळपास 3 हजार रुपयांची (GST सह) घसरण झालेली दिसून येतेय. त्यामुळे ऐन लग्नसराईत सोने खरेदी करण्याची मोठी संधी आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्या-चांदीच्या (Gold And Silver) किंमती तुम्ही घरात बसूनही चेक करु शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन तुम्हाला भाव चेक करता येईल. ज्या क्रमांकावरुन तुम्ही मॅसेज पाठवाल त्यावर किंमतींचा संदेश येईल.