Gold Silver Today : सोने पुन्हा 60 हजारी ; आजचा प्रति 10 ग्रॅमचा दर किती? घ्या तपासून

ऑगस्ट 8, 2023 10:40 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२३ । सोने-चांदीत ऑगस्ट पहिल्या आठवड्यात घसरणीचे सत्र दिसून आले.त्यानंतर या आठवड्यात काल सोमवारी किंमतीत मोठी तफावत दिसली नाही. या घडामोडीत सोन्याचा (Gold Rate) दर पुन्हा 60 हजारावर गेला आहे. दुसरीकडे चांदीचा (Silver Rate) दर 72 हजाराच्या आत आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने 500 रुपयांनी तर चांदी 3,000 रुपयांनी घसरली होती. Gold Silver Rate Today

gold silver 2 jpg webp

गुडरिटर्न्सनुसार, या आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी सोन्याच्या भावात मोठा बदल झाला नाही. 5 ऑगस्ट रोजी सोने 200 रुपयांनी वधारले होते. सध्या 22 कॅरेट सोने 55,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,310 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे. या भावात काय तफावत दिसेल, हे चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.

गेल्या आठवड्यात शेवटच्या सत्रात चांदीने स्वस्ताईचा नारा दिला होता. सोमवारी पण चांदीत घसरण दिसून आली. 100 रुपयांनी या किंमती घसरल्या. सध्या एक किलो चांदीचा भाव 72000 रुपये आहे.

जळगाव सुवर्णनगरीमधील दर
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएटी 54700 रुपये प्रति 10ग्रॅम इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 60,100 रुपायांवर गेला आहे. तसेच एक किलो चांदीचा दर 72000 रुपये इतका आहे.

वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now