गुन्हेपारोळा

अत्याचार : लग्नाचे आमिष देऊन तिला पळवून नेले मग…

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । एका २७ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पारोळा पोलीसांत एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

crime 2022 06 09T164149.685 jpg webp

पारोळा तालुक्यातील एका गावात २७ वर्षीय महिला ही कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दरम्यान, दि. १७ मे रोजी गावातील संशयित आरोपी मुकेश राहूल जाधव (वय २५) याने सदर महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिला पालघर येथील भोईसर येथे पळवून नेले. तेथे नेवून तिच्यावर अत्याचार केला, हा प्रकार दि.२८ मे पर्यंत सुरूच होता. त्यानंतर महिला ही आपल्या गावी आले. मंगळवारी दि. ८ जून रोजी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी मुकेश राहूल जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहे.

Related Articles

Back to top button