वाणिज्य

Petrol-Diesel Rate : वाचा आजचा पेट्रोल डिझेलचा एका लिटरचा दर

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । भारतीय तेल कंपन्यांनी आज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर अपडेट केले आहेत. आज (बुधवार), 20 एप्रिल 2022 रोजी सलग 14 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

petrol diesel 1 jpg webp

राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर ७ एप्रिलपासून स्थिर आहेत. अशा स्थितीत वाहनांच्या इंधनाच्या किमतीत महागाईचा फटका बसलेल्या जनतेला पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल न झाल्याने थोडासा दिलासा जाणवत आहे.

आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार जळगावमध्ये एका लिटर पेट्रोलचा दर 121.69 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर 104.34 रुपये इतका आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे 120.51 आणि 104.77 रुपये एवढा आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 96.67 रुपये एवढा आहे. पुण्यात पेट्रोलचा भाव प्रति लिटर 120.30 रुपये असून, डिझेल 104. 30 रुपयांवर पोहोचले आहे. नागपूरमध्ये पेट्रोलचे भाव प्रति लिटर 120.15 तर डिझेल 102.89 रुपये लिटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल 120.15 तर डिझेल 104.40 रुपये लिटर आहे.

गेल्या महिन्यात जळगावमध्ये पेट्रोलचा दर 111.29 रुपये प्रति लिटर इतका होता, त्यानंतर 22 मार्चपासून पेट्रोल दर सलग वाढत गेले. 1 एप्रिलला पेट्रोल 117.93 रुपये प्रति लिटरवर पोहोचले होते. तर 6 एप्रिलपर्यंत वाढत ते 121.69 पोहोचले. तेव्हापासून पेट्रोल दर स्थिर आहे. एका महिन्यात पेट्रोल जवळपास 10 रुपयाने महागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button