होळीच्या दिवशी सोने-चांदी किमतीत झाला मोठा बदल ; आता 10 ग्रॅमचा ‘हा’ आहे भाव?

जळगाव लाईव्ह न्यूज न्यूज । ६ मार्च २०२३ । तुम्ही जर होळीच्या दिवशी सोने-चांदी खरेदीचा विचार करत असलात तुमच्यासाठी झटका देणारी बातमी आहे. सोने चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज होळीच्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ झालेली दिसून येतेय. सोबतच चांदीही महागली आहे. Gold Silver Rate Today

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील आजचा दर
आज व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सकाळी 11.30 वाजेपर्यंत 24 कॅरेट सोन्याच्या दरात 170 रुपयाची वाढ दिसून आली त्यामुळे सोने 55,881 रुपये प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे. सोबतच आज चांदीच्या किमतीत 271 रुपयाची वाढ झालेली असून चांदी 64,672 प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

जळगाव सराफ बाजारातील दर ?
दरम्यान, जळगाव सराफ बाजारात आज 22 कॅरेट सोन्याचे (Gold Price) दर जवळपास 51,900 रुपये प्रति तोळा आहे. तर 24 कॅरेट सोन्याचे दर आज अंदाजे 56550 रूपये प्रति तोळाने विकले जात आहे. तर दुसरीकडे चांदीचे दर स्थिर असून आज 66900 रुपये प्रतिक किलोने विकले जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

दरम्यान, जळगावात उच्च पातळीपासून गेल्या महिन्याभरात सोन्याच्या दरात जवळपास 3 हजार रुपयांची (GST सह) घसरण झालेली दिसून येतेय. फेब्रुवारीत आंतरराष्ट्रीय घडामाेडींसह‎ केंद्रीय अर्थसंकल्प दरम्यान साेन्याचे प्रति‎ ताेळा ५८,८०० जीएसटीसह ६० हजारांवर गेले‎ हाेते. गेल्या महिन्याच्या तुलनेत‎ आता साेन्याच्या भावात घसरण झाल्याने‎ त्याचा लाभ घेण्यासाठी बाजारपेठेत‎ ग्राहकांची पावलं वळली आहेत.

जाणून घ्या सोन्या-चांदीचे भाव कसे ठरतात
भारतातील सोन्या-चांदीची किंमत फ्युचर्स मार्केटच्या ट्रेडिंगनुसार ठरवली जाते. ट्रेडिंग दिवसाचा शेवटचा बंद हा पुढील दिवसाचा बाजारभाव मानला जातो. मात्र, हे केंद्रीय पारितोषिक आहे. यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये इतर काही शुल्कासह दर निश्चित केले जातात आणि त्यानंतर किरकोळ विक्रेता दागिन्यांमध्ये मेकिंग चार्जेस आकारून त्याची विक्री करतो.

22 आणि 24 कॅरेट सोन्यामध्ये फरक
24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध असले तरी ते अतिशय लवचिक आणि कमकुवत आहे. या कारणास्तव त्यापासून दागिने बनवता येत नाहीत.