सोने स्थिर, चांदी पुन्हा घसरली ; तपासून घ्या आजचा नवीन दर..

मे 31, 2023 11:14 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२३ । सध्या लग्नाचा हंगाम सुरू असून लग्नाच्या धामधुमीत सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उच्चांकापासून सोन्याच्या दरात मोठी घसरण झालीय. सोबत चांदीही घसरली आहे. फेब्रुवारी, एप्रिल महिन्यात सोन्याने दरवाढीचा एक एक विक्रम नोंदवला होता. मे महिन्यात तर सोने किमतीने आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडून नवीन विक्रम केला होता. मात्र सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम दीड ते दोन हजार रुपयांपर्यंतची घसरण झाली. 

gold silver jpg webp

जळगावात सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर 55,350 रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,400 रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका आहे. गेल्या आठवड्याभरात 1200 रुपयाची घसरण झालेली दिसून येत आहे. उच्चांकापासून सोने जवळपास 2 हजार रुपयांनी घसरले आहे. 5 मे रोजी सोन्याचा प्रति तोळ्याचा दर 62 हजारांवर गेला होता.

दुसरीकडे सध्या एक किलो चांदीचा दर 71000 रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. उच्चांकापासून चांदी जवळपास 6 हजार रुपयांनी घसरले आहे. 5 मे रोजी चांदीचा दर 77 हजार रुपयावर गेला होता.

मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवरील आजचा दर?
मल्टी-कमोडिटी एक्सचेंजव आज बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत किंचित घसरले असून सोने 59,951 रुपये प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे. दुसरीकडे चांदीचा दर किंचित 60 रुपयांनी घसरले असून 70,985 रुपयावर व्यवहार करत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now