शुक्रवार, डिसेंबर 1, 2023

Gold Silver Today : सोने आणि चांदीचे दर पुन्हा कडाडले, प्रति ग्रॅमचा दर पहा..

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२३ । भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येतेय. गेल्या काही दिवसापासून 58 हजाराच्या घरात असलेला सोन्याचा दर पुन्हा 59 हजारांवर गेला आहे. तर चांदीने देखील 70 हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

काही केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढीचा इशारा दिला आहे. डॉलर सध्या मजबूत स्थितीत आहे. या घडामोडींमुळे सोने आणि चांदी दबावात आल्यामुळे किंमतीत चढउतार दिसून येत आहे. पण गेल्या दोन महिन्यांपासून दोन्ही मौल्यवान धातूत मोठी घसरण झाल्याने ग्राहकांनी सराफा बाजारात गर्दी केली आहे.

जळगावातील सोने आणि चांदीचा दर?

सध्या सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 54050 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 59000 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. दरम्यान, यापूर्वी मंगळवारी सकाळी सोन्याचा दर 58950 रुपयांवर होता. दुसरीकडे एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी 70,500 रुपयांवर आहे. यापूर्वी काल सकाळी चांदीचा दर 70000 रुपयांवर होता. त्यात 500 रुपयांची वाढ झालेली दिसून येतेय.

गुडरिटर्न्सने आज सकाळचे दर अपडेट केले नाहीत
27 जून रोजी 24 कॅरेट सोने 58,442 रुपये, 23 कॅरेट 58,208 रुपये, 22 कॅरेट सोने 53,533 रुपये, 18 कॅरेट 43,832 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34189 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीत दरवाढ झाली. काल सायंकाळी एक किलो चांदीचा भाव 69,523 रुपये होता. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे.