वाणिज्य
ग्राहकांसाठी आनंदवार्ता ! अनेक महिन्यानंतर चांदीचा दर 70 हजाराखाली, सोनेही घसरले..
जळगाव लाईव्ह न्यूज | 26 फेब्रुवारी 2024 | लग्नसराईच्या काळात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. यामुळे अनेक महिन्यानंतर चांदीचा भाव 70 हजार रुपयाच्या खाली आला.
भारतीय वायदे बाजारात मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदीच्या दरात आज, २६ फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मोठी घट नोंदवली गेली आहे. चांदीचा दर 490 रुपयांनी घसरून 69,988 रुपयावर ट्रेंड करत आहे. दुसरीकडे सोन्याचा दर 100 रुपयांनी घसरून 62,250 रुपयावर व्यवहार करत आहे.
भारतीय बाजारात आज 24 सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 62,600 रुपयांवर आहे तर एक किलो चांदीचा दर 71300 रुपयांवर आला आहे. आज ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी उत्तम संधी आहे.