⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

सणासुदीपूर्वीच सोने महागले ; मात्र चांदी घसरल, वाचा बाजारातील स्थिती?

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२२ । उद्यापासून म्हणेजच सोमवारपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. त्यामुळे भारतात सणासुदीला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले. मात्र दुसरीकडे चांदीच्या दरात घसरण दिसून आलीय.

संपूर्ण ट्रेडिंग आठवड्यात सोन्याच्या भावात 112 रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव 49,320 प्रति 10 ग्रॅम होता, तो या आठवड्यात वाढून 49,432 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. चांदीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या व्यापारिक आठवड्यात चांदीच्या भावात 254 रुपयांची घट झाली आहे. गेल्या आठवड्यात चांदीचा दर 56,354 प्रति 1 किलो होता, तो या आठवड्यात 56,100 रुपयांवर आला आहे.

IBJA सोन्याची किंमत जाहीर करते
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) सोमवार ते शुक्रवार या व्यापाराच्या दिवशी सोन्याची किंमत जाहीर करते. IBGA वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या वेगवेगळ्या किंमती जारी करते. IBJA ने जारी केलेली सोन्याची किंमत देशातील सर्व राज्यांमध्ये वैध आहे, परंतु त्यात GST आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत. यामुळे प्रत्येक राज्याचे सोन्याचे दर वेगवेगळे आहेत.

19-23 सप्टेंबरपर्यंत सोन्याच्या दरात असा बदल झाला होता- (प्रति 10 ग्रॅम)
19 सप्टेंबर – 49,320 रु
20 सप्टेंबर – रु. 49,368
21 सप्टेंबर – 49,606 रु
22 सप्टेंबर- 49,894 रु
23 सप्टेंबर – 49,432 रु

गेल्या एका आठवड्यात चांदीचा दर किती बदलला :
19 सप्टेंबर – रु. 56,354
20 सप्टेंबर – रु. 56,354
21 सप्टेंबर – रु. 56,667
22 सप्टेंबर – रु 57,343
23 सप्टेंबर – रु. 56,100

जळगावमधील दर
जळगाव सराफ बाजरात सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 45,258 रुपये इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 50,500 रुपये इतका आहे. यापूर्वी आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,600, मंगळवारी 50,550, बुधवारी 50,600, गुरुवारी 50,500, शुक्रवारी 50,700, शनिवारी 50,100 असा होता. दरम्यान, दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा दर 56,800 रुपये इतका आहे. तो यापूर्वी 58,700 रुपये आहे. तसेच गेल्या आठवड्यात 57,000 रुपये इतका होता.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोने खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा
सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे अनेक बनावट दागिनेही बाजारात मिळू लागले आहेत. अशा परिस्थितीत, आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) लोकांना खोटे दागिने ओळखण्यासाठी हॉलमार्क तपासण्याचा सल्ला देते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 18 कॅरेटवर 750, 21 कॅरेटवर 875, 23 कॅरेटवर 958 आणि 24 कॅरेट सोन्यावर 999 लिहिले आहे.