गुरूवार, जून 8, 2023

ग्राहकांना दिलासा! चांदी पुन्हा घसरली, उच्चांकपासून 5000 रुपयांनी स्वस्त..

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२३ । आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीमुळे मागील गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहे. मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सलग चौथ्या दिवशी चांदीच्या किमतीत घसरण झालेली दिसून येत आहे. सोबतच सोने देखील आज घसरले आहे. त्यामुळे सोन्याचा दर पुन्हा 60 हजाराच्या खाली आला आहे.

आज गुरुवारी मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी 11 वाजेपर्यंत सोन्याचा दर 176 रुपयांनी 59,684 रुपयावर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत 314 घसरण झाली आहे. यामुळे एक किलोचा दर 70,772 रुपयावर व्यवहार करत आहे.

जळगाव सराफ बाजारातील दर?
दुसरीकडे जळगाव सराफ बाजारात सध्या 22 कॅरेट सोन्याचा 56,500 रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका आहे. तर 24 कॅरेट सोने 61,700 रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा दर 72,150 रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. यापूर्वी दोन दिवसापूर्वी सकाळच्या सत्रात चांदीचा दर 73,200 रुपये प्रति किलो इतका होता. त्यात आतापर्यंत 1000 हजार रुपयाची मोठी घसरण झालेली पाहायला मिळतेय.

सोने चांदीचा दर आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा किती खाली आहे ते जाणून घ्या
सोने त्याच्या सर्वकालीन उच्चांकावरून 400 ते 500 रुपयांनी स्वस्त होत आहे. यापूर्वी, 5 मे 2023 रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 62,100 रुपये (विनाजीएसटी) प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. दुसरीकडे, चांदी 4850 रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकाच्या खाली व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 77000 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला.