सोने-चांदीच्या किमतीत चढउताराचे सत्र कायम! आजचा काय आहे भाव? पहा..

मे 24, 2023 10:53 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२३ । सध्या डॉलर वरचढ ठरल्याने सोने-चांदीच्या किंमतीत घसरण दिसून आली. सलग दोन दिवस सकाळच्या सत्रात स्वस्त झालेलं सोनं पुन्हा महागलं आहे. मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज बुधवारी सकाळी सोन्याचं किमतीत वाढ झालेली दिसून आली. यामुळे सोन्याचा दर पुन्हा 60 हजारांवर गेला आहे. मात्र दुसरीकडे चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे.

gold silver jpg webp

आज बुधवारी मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याचा दर किंचित 30 रुपयांनी वाढून 60,225 रुपयावर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. सकाळी चांदीचा दर 259 रुपयाची घसरण झालेली असून त्यामुळे एक किलोचा दर 71,905 रुपयावर व्यवहार करत आहे.

जळगाव सराफ बाजारातील दर?
दुसरीकडे जळगाव सराफ बाजारात सध्या 22 कॅरेट सोन्याचा 56,300 रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका आहे. तर 24 कॅरेट सोने 61,400 रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा दर 72,600 रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात चांदीचा दर 73,200 रुपये प्रति किलो इतका होता. त्यात आतापर्यंत 1000 हजार रुपयाची मोठी घसरण झालेली पाहायला मिळतेय.

दरम्यान, 2,000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) निर्णयानंतर सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीत किरकोळ वाढ झाल्याचे ज्वेलर्सचे म्हणणे आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now