⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | सोन्यात पुन्हा २०० रुपयाची वाढ ; वाचा आज काय आहे सोने-चांदीचा दर

सोन्यात पुन्हा २०० रुपयाची वाढ ; वाचा आज काय आहे सोने-चांदीचा दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२४ । या आठवड्यात सोन्याच्या कितमीने मोठी उसळी घेतली. ऐन लग्नसराईत दरात झालेल्या वाढीने सराफा बाजारात खरेदीसाठी आलेल्या खरेदीदारांना मोठा फटका बसला. जळगावात या आठवड्यात सोन्याच्या दरात ७०० ते ८०० रुपये प्रति तोळ्याची वाढ झाली. चांदी मात्र चढ-उतार दिसून आली.

गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा दर ६५८०० रुपयांवर तर चांदी ७५००० रुपयावर होती. या आठ्वड्यात मात्र वाढ झाली. सोन्याचा गुरुवारी सोन्याचा दर ६७ हजार रुपये उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. उच्चांकावर पोहोचलेल्या सोन्याच्या भावात शुक्रवारी ९०० रुपयांची घसरण झाल्यानंतर शनिवारी (दि. २३) त्यात पुन्हा २०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने ६६ हजार ६०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. चांदीचे भाव मात्र ७४ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर स्थिर आहेत.

चार दिवसांपूर्वी बुधवारी (दि. २०) सोने ६६ हजारांच्या पुढे जाऊन ६६ हजार १०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते. गुरुवारी (दि. २१) एकाच दिवसात सोन्यात एक हजार २०० रुपयांची वाढ होऊन ते ६७ हजार ३०० रुपये प्रतितोळा झाले. मात्र शुक्रवारी त्यात ९०० रुपयांची घसरण झाली. शनिवारी त्यात पुन्हा २०० रुपयांची भाववाढ झाली. अमेरिकन बैंकिंग क्षेत्रामुळे सोन्याच्या भावात सतत चढ- उतार होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.