⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

रशिया-युक्रेन युद्धामुळे सोने आणखी महागणार? वाचा आजचा प्रति तोळ्याचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । रशियाने युक्रेनविरुद्ध युद्धाला सुरुवात केलीय. यामुळे जागतिक बाजार पेठेत हाहाकार माजली आहे. याच पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची दाट शक्यता आहे. आज जळगाव सराफ बाजार पेठेतमध्ये सकाळच्या सत्रात सोन्याच्या भावात ५० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात २५० रुपयाची वाढ झाली आहे. त्यापूर्वी कालच्या सत्रात सोने २६० रुपयांनी तर चांदी ७७० रुपयांनी महागले होते.

आजचा सोने आणि चांदीचा भाव?
आज जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५१,५६० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा ६६,१०० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ दिसून येते.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या वृत्तामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस १९३५ डॉलरच्या पुढे गेला आहे.रशियाने युक्रेनच्या तणावामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीला (Gold) प्राधान्य देत आहे. दरम्यान सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने सोने, चांदीच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम देखील सोने चांदीच्या किमतीवर होताना दिसून येत आहे. मागणी वाढल्याने भाव वधारले आहेत.

रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढल्यास सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल, असे मानले जात आहे. सोने लवकरच 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी गाठू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

या आठवड्यातील दर?
जळगाव सराफ बाजारात सोमवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५१,२९० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ५१,२५० तर आज बुधवारी ५१,५१० इतका आहे. तर दुसरीकडे सोमवारी चांदीचा प्रति किलोचा दर ६५,४०० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ६५,०८० तर आज बुधवारी ६५,८५० इतका आहे.

हे देखील वाचा :