खुशखबर! दीड-दोन महिन्यानंतर सोने-चांदीचा दर आला जुन्या पातळीवर

जून 23, 2023 10:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२३ । जागतिक बाजारात सोने-चांदी (Gold Silver) दबावाखाली असून त्याचा परिणाम भारतीय सराफा बाजारात दिसून येत आहे. दरम्यान, सोने (Gold Rate) आणि चांदीच्या किमतीत घसरणीचा काळ सुरु असून मे महिन्याच्या विक्रमी पातळीवर पोहोचलेला सोन्याचा दर आता 59 हजाराखाली आला आहे. चांदीचा (Silve Rate) दर देखील 67 हजाराच्या घरात आलीय. किंमतीं गेल्या दोन महिन्यात इतक्या झरझर खाली येतील, याचा अंदाज कोणीच बांधला नव्हता.

gold 7 jpg webp

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आजचा दर?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याचा दर किंचित 35 रुपयाची वाढीसह 58,230 रुपयावर व्यवहार करत आहे. दुसरीकडे चांदीचा दर 232 रुपयांनी घसरला आहे. यामुळे एक किलोचा चांदीचा दर 68,076 हजारावर व्यवहार करत आहे.

जळगावातील सोने दर?
जळगाव सुवर्ण नगरीत दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी घसरण झालेली पाहायला मिळतेय. जळगावात सध्या 22 कॅरेट विनाजीएसटी सोन्याचा भाव विनाजीएसटी 54,040 रुपये प्रति तोळा इतका आहे. हाच दर काल सकाळी 54,350 रुपयांनी विकला जात होता. त्याचबरोबर सध्या 24 कॅरेट विनाजीएसटी सोन्याचा भाव विनाजीएसटी 59,000 रुपये प्रति तोळा इतका आहे. यापूर्वी काल सकाळी 24 कॅरेट सोन्याचा दर 59,300 रुपयावर होता. म्हणजेच यात 300 रुपयाची घसरण झालेली दिसून येतेय.

दरम्यान, या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी (19 जून) सोन्याचा प्रति तोळ्याचा दर 59,800 रुपये इतका होता. त्यात पाच दिवसात तब्बल 800 रुपयांहून अधिकची घसरण झालेली दिसून येतेय.

चांदीचा दर
जळगावमध्ये सध्या चांदीचा दर विनाजीएसटी 70000 खाली विकला जात आहे. यापूर्वी काल सकाळी चांदीचा दर 71000 रुपयावर विकला जात होता. तर सोमवारी (19 जून) चांदीचा दर 73500रुपये इतका होता. त्यात पाच दिवसात तब्बल 3500 रुपयांहून अधिकची घसरण झालेली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now