जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२४ । केंद्र सरकारने सोने आणि चांदी दरावरील सीमा शुल्कात कपात केल्यानंतर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दोन्ही धातूंच्या किमतीने मोठी घसरण झाली होती. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला होता. परंतु या महिन्यात सोन्यासह चांदीने उसळी घेतली. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोने वधारले, चांदीतही वाढ दिसून आली. मात्र आठवड्याच्या अखेरीस सोने आणि चांदीने नरमाईचा सूर आळवल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला.
सोन्याने 550 रुपयांची झेप घेतली तर चांदी 1,000 रुपयांनी वधारली होती. त्यानंतर किंमतीत मोठा बदल दिसला नाही. आता गुरुवारपासून सोन्यात नरमाईचे सत्र आहे. चांदीची किंमत स्थिर आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या भावात मोठा बदल झाला नाही. तर 20 ऑगस्ट रोजी 120 रुपयांची घसरण झाली. 21ऑगस्ट रोजी सोने अनुक्रमे 550 वधारले. तर 22 ऑगस्ट रोजी सोन्यात 380 रुपयांची घसरण झाली. आज सकाळच्या सत्रात मौल्यवान धातूच्या किंमतीत घसरणीचे संकेत दिसत आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
गेल्या आठवड्यात चांदीने 4,000 रुपयांची मुसंडी मारली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीत कोणताच बदल दिसला नाही. 20 ऑगस्ट रोजी चांदी 1 हजार रुपयांनी वधारली होती. 21 आणि 22 ऑगस्ट रोजी चांदीचा भाव स्थिर होता. आज सकाळच्या सत्रात चांदीने घसरणीचे संकेत दिले आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,900 रुपये आहे.