जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२३ । सोने (Gold Rate) खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आज सोन्या-चांदीच्या (Silver Rate) दरात घसरण पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून दोन्ही धातूंच्या किमतीत वाढ होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सोन्याचा दर पुन्हा ६० हजारांवर तर चांदीचा दर ७६ हजारांवर गेला. Gold Silver Rate Today
जळगाव सुवर्णनगरीतील सोने-चांदीचा भाव?
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या २२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भाव विनाजीएसटी ५४,९५० रुपये इतका असून यापूर्वी काल सकाळच्या सत्रात ५५,२०० रुपये इतका होता. एकंदरीत २२ कॅरेट सोन्याच्या किमतीत ३०० ते ३५० रुपयांची घसरण दिसून येतेय.
तर सध्या २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भाव विनाजीएसटी ६०,००० रुपयांवर आला आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात सोने ६०३०० रुपये इतके होते. त्यात ३०० रुपयाची घसरण झालेली दिसून येतेय. चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी ७६,३०० रुपयावर विकला जात आहे.
दरम्यान, सोने आणि चांदीची आगेकूच सुरु आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते आता पर्यंत सोने-चांदीत मोठी उलाढाल झाली. दोन्ही धातूंनी मुसंडी मारली. या महिन्यात सोन्याने २००० ते २२०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे तर चांदीने ६००० ते ६२०० रुपयांची झेप घेतली आहे. अजून दोन्ही धातूंना किंमतीत नवीन रेकॉर्ड करता आलेला नाही.