⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

खरेदीदारांसाठी खुशखबर.. सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी घसरली, पहा काय आहे नवीन दर

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२३ । सोने-चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. सोने त्याच्या ऑलटाईम हाय पेक्षा स्वस्त दरात मिळत आहे. गेल्या दोन आठवड्याच्या घसरणीला सोमवारी सोने आणि चांदीने ब्रेक लावला. त्यानंतर वायदे बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून आलीय. Gold Silver Rate Today

MCX वरील आजचा दर?
MCX वर आज सकाळी १०.३० वाजेपर्यंत २४ कॅरेट सोन्याचा दर किंचित ७३ रुपयांनी घसरले आहे. त्यामुळे सोने ५६,१४० रुपये प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे. सोबतच आज चांदीच्या किमतीत १९४ रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे एक किलो चांदीचा दर ६५,५५५ रुपयावर व्यवहार करत आहे.

सोन्यात जोरदार घसरण झाली. सर्वकालीन उच्चांकानंतर सोने २६६० रुपये प्रति १० ग्रॅम स्वस्त झाले. यापूर्वी सोने २ फेब्रुवारी २०२३ रोजी ऑलटाईम हाय होते. यादिवशी सोने ५८,८०० रुपये प्रति दस ग्रॅमवर पोहचले होते. चांदी, तिच्या विक्रमी उच्चांकापेक्षा जवळपास १४,४२५ रुपये प्रति किलो स्वस्त मिळत आहे. चांदीचा ऑलटाईम हाय ७९९८० रुपये प्रति किलो आहे.

जळगाव सुवर्णनगरीतील दर
जळगाव सराफ बाजारात आज २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ५१,६०० रुपये इतका आहे. तर २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ५६,५०० रुपये इतका आहे. तर चांदीचा एक किलोचा दर ६७००० रुपये इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.