शनिवार, डिसेंबर 2, 2023

सोन्याचे दर धडाम, जाणून घ्या किती स्वस्त झाले..

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२३ । भारतात दररोज सोने-चांदीचे (Gold Silver Rate) दर बदलतात. दिवसातून दोन वेळा हे दर बदलतात. ऐन लग्नसराईच्या हंगामात सोन्यासह चांदीच्या किमतीने नवा उच्चांक गाठल्याने गाहकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र उच्चांकापासून आता सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. सोबतच चांदीचीही चमक फिकी पडली आहे. सध्या मल्टी कमोडिटी एक्सचेंवर सोन्याचा दर 60 हजाराखाली आला आहे.

आजचा मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरील भाव?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज मंगळवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याचा 10 ग्रॅम सोन्याचा दर 59,263 रुपयांवर व्यवहार करत आहे. यापूर्वी कालच्या सत्रात सोने 59,582 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाले होते. अशाप्रकारे सध्या सोने 319 रुपयांने स्वस्त झालेलं दिसून येतेय.

तर दुसरीकडे एक किलो चांदीचा दर 72,420 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या सत्रात चांदीचा दर 72, 359 रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला. त्यात किंचित वाढ झालेली दिसून येतेय.

जळगाव सुवर्णनगरीतील दर
जळगावात देखील सोन्याच्या किमतीत घसरण झालेली दिसून येतेय. काही दिवसापूर्वी 60 हजारावर असलेला सोन्याचा दर विनाजीएसटी 59,800 रुपयांवर आला आहे. सध्या चांदीचा दर विनाजीएसटी 73,500 रुपयांवर आहे. गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात 1300 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.