⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

Gold Silver Rate : सोने पुन्हा महागले, वाचा आजचे सोने-चांदीचे भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२२ । जळगाव सराफ बाजारात आज पुन्हा सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. त्यामुळे सोने पुन्हा ४९ हजारांवर गेले आहे. तर चांदीच्या घसरणीला देखील आज ब्रेक लागला आहे. आज चांदीच्या भावात वाढ झाली आहे. आज १० ग्रॅम सोन्याच्या भावात २९० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदी ३९० रुपये प्रति किलोने महागली आहे. त्यापूर्वी काल सोने किंचित ७० रुपयाने महागले होते तर चांदी ५० रुपयांनी स्वस्त झाली होती.

आजचा सोने आणि चांदीचा दर?
आजच्या दरवाढीने जळगाव सराफ बाजारात सोने ४९,०९० रुपये प्रति तोळा इतका आहे. चांदीचा भाव ६२,८०० रुपये प्रति किलो इतका झाला आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात 4 ते 5 हजारांची वाढ दिसून येते.

दरम्यान, काल संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्पाच्या दिवशी भारतीय बाजारात तेजी दिसून आली. परंतु दुसरीकडे अर्थसंकल्पापूर्वी सोन्याच्या भावात किंचित वाढ झाली होती. तर चांदीच्या दरात घसरण झाली होती. मागील काही दिवसापासून सराफ बाजारात सोने चांदीचे भाव एका विशिष्ट पातळीवरून वर खाली होत असल्याचे दिसून आली.

जळगाव सराफ बाजारात गेल्या महिन्यात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ उतार होत असल्याचे पहायला मिळाले. गेल्या महिन्याच्या १ जानेवारीला सोने ४९,०१० प्रति तोळा इतका होता. तर चांदी ६३,६२० रुपये प्रति किलो इतका होता. काल महिन्याच्या अखेरीस सोने ४८,७३० रुपये प्रति तोळ्यावर आला होता. तर चांदी ६२,४६० रुपये किलोवर आले होते.

गेल्या तीन दिवसात सोने दोन वेळा महाग तर एक वेळा स्वस्त झालं आहे. त्यात सोने किंचित ६० रुपयाने महागले आहे. तर चांदीच्या दरात ६०० रुपयाची घसरण दिसून आलीय.

सोने दर :
३१ जानेवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७३० रुपये प्रति तोळा
०१ फेब्रुवारी (मंगळवार) ४८,८०० रुपये प्रति तोळा
०२ फेब्रुवारी (बुधवारी) ४९,०९० रुपये प्रति तोळा

चांदी दर:
३१ जानेवारी (सोमवार) चांदीचा दर ६२,४६० प्रति किलो
०१ फेब्रुवारी (मंगळवार) चांदीचा दर ६२,४१० प्रति किलो
०२ फेब्रुवारी (बुधवारी) चांदीचा दर ६२,८०० प्रति किलो

सोन्याची शुद्धता कशी तपासायची
24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिले आहे.
22 कॅरेटच्या दागिन्यांवर 916 लिहिले आहे.
21 कॅरेट सोन्याच्या ओळखीवर 875 लिहिले जाईल.
18 कॅरेटच्या दागिन्यांवर 750 लिहिले आहे.
14 कॅरेटच्या दागिन्यांवर 585 लिहिले आहे.

सूचना : सदर सोने आणि चांदीने दर हे ऑनलाईन आहे. तरी अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.

हे देखील वाचा :