पंधरवड्यात चांदी 5500 हजाराने वाढली ; सोन्यातही दिलासा नाही, पहा आजचे भाव
जळगाव लाईव्ह न्यूज । 17 मार्च 2024 । मार्च महिन्यात सोन्याच्या किमतीने आजपर्यंतचा सर्वात उच्चांकी दर गाठला आहे. मागील काही दिवसापासून जळगावातील सराफ बाजारात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी ६६ हजार रुपयांवर गेला होता. दुसरीकडे चांदीनेही मोठी उसळी घेतली. आंतरराष्ट्रीय घडामोडींसह जगतातील नफेखोरांमुळे चांदीचे प्रतिकिलोचे दर १५ दिवसांत साडेपाच हजार रुपयांनी वाढले.
मार्च दरम्यान सोने आणि चांदीने मोठी घौडदौड केली. सध्या जळगावात २२ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ६०,३६० रुपये प्रति तोळ्यावर आहे तर २२ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ६५,९०० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा एक किलोचा दर ७६,००० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, दरातील वाढीने जळगावच्या प्रत्यक्ष बाजारातील उलाढाल निम्म्यापेक्षा अधिक प्रभावित झाली असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
चांदीने घेतली उसळी
मार्च महिन्याच्या पहिल्या तारखेला चांदी प्रतिकिलोचे दर ७१५०० होते. दुसऱ्या दिवशी त्यात ५०० रुपयांची वाढ झाली. पुन्हा ४ तारखेला दीड हजारांची वाढ होऊन ७३५०० रुपयांवर पोहोचलेले दर खाली-वर होत ८ ते ११ मार्च दरम्यान ७४००० रुपयांवर स्थिरावले. गुरुवारी पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाली. तर शुक्रवारी दीड हजारांची वाढ होऊन चांदी ७६००० रुपये किलोवर गेली आहे. ही पंधरा दिवसांतील साडेपाच हजारांची दरवाढ आहे. दरम्यान, पुढील आठ ते दहा दिवस ही दरवाढ कायम राहू शकते.