जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२३ । सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच असून काल सोन्याच्या किमतीत वाढ झालेली दिसून आलीय. सोबतच चांदी देखील महागली आहे. सोने जवळपास ३५० ते ४०० रुपयांनी महागले आहे. तर चांदी तब्बल १००० रुपयांनी वधारली आहे. Gold Silver Rate
जळगाव सराफ बाजारात शुक्रवारी सकाळी सोन्याचा दर २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,४०० रुपये प्रति तोळा इतका होतो तो आज शनिवारी सकाळी ५४,६८५ रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे.
तर काल सकाळी २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,३५० रुपये प्रति तोळा इतका होता. तो आज ५९,७०० रुपयावर गेला आहे. म्हणजेच सोन्याच्या किमतीत ३५० ते ४०० रुपयापर्यंतची वाढ झालेली आहे. सध्या एक किलो चांदीचा दर ७३,००० रुपये इतका आहे. काल सकाळी हा दर ७२००० रुपयावर होता. त्यात आतापर्यंत १००० रुपयाची वाढ झालेली दिसून येतेय.
उच्चांकापासून सोने जवळपास १३०० ते १४०० रुपयांनी स्वस्त विकले जात आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात ५ मे ला सोन्याचा दर विनाजीएसटी ६२ हजार रुपयावर गेला होता. दुसरीकडे चांदी उच्चांकापासून ४००० ते ४५०० रुपयांनी स्वस्त विकले जात आहे.