सोमवार, डिसेंबर 11, 2023

दिलासादायक! सोने-चांदीच्या दरवाढीला ब्रेक, पहा आताचा प्रति 10 ग्रॅमचा दर?

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२३ । अमेरिकेतील घडामोडींचा थेट परिणाम जागतिक बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात दिसून आला. एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला विनाजीएसटी ६२ हजारावर गेलेल्या सोन्याच्या किमतीत मागील दीड दोन महिन्यात घसरण झाल्याने ५८ हजारावर आले होते. मात्र मागील गेल्या काही दिवसात झालेल्या वाढीने सोने पुन्हा ६० हजारांवर गेले. या महिन्यात सोने-चांदीने जबरदस्त आगेकूच सुरु केली आहे. दरम्यान, आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात सोन्यासह चांदीच्या वाढीला ब्रेक लागला असून दोन्ही धातूंच्या किमती घसरल्या आहे. Gold Silver Rate

मल्टी कमोडिटी एक्सचेंवरील दर?
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोमवारी सकाळी १०.३० वाजेपर्यंत सोन्याच्या किमतीत १२३ रुपयाची घसरण झालेली दिसून दिसून आली. यामुळे प्रति तोळा सोन्याचा दर ५९,१९३ रुपयावर व्यवहार करत आहे. दुसरीकडे चांदीच्या किमतीत देखील घसरण झाली असून सकाळी चांदीच्या किमतीत २५० रुपयाची घसरण झाल्याने चांदीचा एक किलोचा दर ७५,७१६ रुपयावर व्यवहार करत आहे.

जळगाव सुवर्णनगरीतील भाव?
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या २२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भाव विनाजीएसटी ५४,५०० रुपये. तर २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भाव विनाजीएसटी ५९,६०० रुपयापर्यंत पोहोचला आहे. तर चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी ७५,६०० रुपयावर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात चांदीच्या किमतीत ५००० ते ५५०० रुपयापर्यंतची वाढ झालेली दिसून आली.

दरम्यान, मेनंतर जून महिन्यात पण सोने-चांदीने हेच नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. या दोन्ही धातूंना नवीन रेकॉर्ड करता आलेला नाही. फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात सोने-चांदीने दरवाढीचे नवीन रेकॉर्ड तयार केले होते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.