⁠ 
शनिवार, मे 18, 2024

सलग तिसऱ्या दिवशी सोने स्वस्त, चांदीही घसरली, जाणून घ्या आजचे दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२२ । जळगाव सुवर्णनगरीत सलग तिसऱ्या दिवशी सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) भावात मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसापासून वाढत्या दरवाढीने सोने ५५ हजारांवर गेले होते. मात्र, गेल्या तीन दिवसापासून होत असलेल्या घसरणीमुळे सोने ५३ हजाराच्या खाली आले आहे. आज बुधवारी सोने १० ग्रॅम सोन्याच्या भावात तब्बल ७६० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदी ५३० रुपयाने स्वस्त झाली आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात सोने ५९० रुपयाने तर चांदी १५६० रुपये प्रति किलोने स्वस्त झाली होती.

आजचा जळगावमधील सोने-चांदीचा भाव?
आज शुक्रवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,७७० रुपये इतका आहे. तर चांदी ६९,९३० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर मागील काही सत्रात सोने आणि चांदीमध्ये मोठी वाढ झाली होती. त्या पार्श्वभूमीवर जळगाव सराफ बाजारात सोन्याचा भाव ५५५०० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. दोन आठवड्यात सोन्याचा भाव जवळपास ४००० रुपयांची वाढ झाली होती. तर चांदीच्या भावात ६५०० ते ७००० हजार रुपयाची वाढ झाली होती. मात्र त्यानंतर त्यात विक्रीचा सपाटा सुरु झाला आणि नफावसुली दिसून आली.

जळगाव सराफ बाजारात तीन दिवसात सोने १७३० रुपयाची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात २१९० रुपयाची घट झाली आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात जळगाव सराफ बाजारात सोने १५०० रुपयांनी महागले आहे. तर चांदी २६०० रुपायांनी महागली. मात्र आता सोने चांदीचे दर घसरत असून ग्राहक दुकानांमध्ये सोने खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे दिसून आले.

गेल्या आठवड्यात असे होते दर?
जळगाव सराफ बाजारात सोमवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५३,७९० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ५४,७७०, बुधवारी ५५,५००, गुरुवारी ५३,९८०, शुक्रवार ५४,४९० इतका आहे. तर दुसरीकडे सोमवारी चांदीचा प्रति किलोचा दर ७०,७८० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ७१,६१०, बुधवारी ७३,०६०, गुरुवारी ७१,२१०, शुक्रवार ७२,१२० प्रति किलो इतका होता.

हे पण वाचा :