आजचा सोने चांदीचा भाव ; कुठपर्यंत आला दर? तपासून घ्या

जून 7, 2023 1:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ जून २०२३ । सोने आणि चांदीच्या किमतीत सुरु असलेली चढ-उतार कायम असून आज दोन्ही धातूमध्ये घसरण झालेली दिसून येतेय. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर दुपारी बारा वाजेपर्यंत सोन्यासह चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे.

gold silver 1 1 jpg webp

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज बुधवारी 12 वाजेपर्यंत सोन्याचा दर 177 रुपयांनी घसरला असून प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 59,808 रुपयांवर व्यवहार करत आहे. सोबतच चांदीचा दर 308 रुपयांनी घसरण असून एक किलो चांदीचा दर 71,648 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

जळगावात सध्या सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा दर 54,500 रुपये (विनाजीएसटी) प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,500 रुपये (विनाजीएसटी) प्रति 10 ग्रॅमवर आला आहे.

सोने सध्या 1700 ते 1800 रुपयांनी प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. यापूर्वी 5 मे 2023 रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला. त्यावेळी सोन्याचा भाव विनाजीएसटी 62200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now